शनिवार, २४ जुलै, २०१०

मित्र जीवांचे (???)

धडाकेबाज या पिक्चरमधे एक गाणे आहे "हि दोस्ती तुटायची नाय...."

जीवाभावाचे, एकमेकांसाठी जीव हि देणारे दोस्त खरेच दोस्त असतात का?

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात एकदा तरी असा प्रसंग आलेला असतो जेव्हा आपले कोण आणि परके कोण याची पारख झालेली असते. ज्यांच्याबरोबर काल परवा पर्यंत एका ताटात जेवलेले असतो तेच आज आपल्या वाईट प्रसंगी पाठ फिरवुन गेलेले असतात. ज्यांच्यासाठी नकोत्या कारणासाठी, नको तिथे, नको तेवढे पैसे खर्च केलेले असतात तेच मित्र आज आपल्याला मदत करताना वेगवेगळी कारणे सांगत असतात.

अश्या वाईट प्रसंगी आपल्या घरचेच आपल्यापाठीशी खंबीरपणे उभे राहतात. ज्यांचे बोलणे आपल्याला एकेकाळी कटु वाटत असतात पण त्यांच्याच खांद्यावर डोके ठेवुन मन मोकळे करण्यासाठी आपण आपल्या वाईट प्रसंगी आतुर असतो.

खुप वेळा या मित्रांना खड्ड्यातुन बाहेर काढताना आपणच खड्ड्यात गेलेलो असतो. तरी आपण त्यांना आपले मित्र म्हणवुन घेतो.

हे सर्व लिहायचे कारण की..... कालच माझ्या एका ओळखीच्या मुलाचे लग्न अश्या नालायक मित्रांमुळे पुढे ढकलता ढकलता वाचले.

त्याचे असे झाले की, या येड्याने एकेकाळी मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्ट्याकरण्यासाठी, मैत्रिंणीना फिरवण्यासाठी, जुगाराची आणि बारची बिले भरण्यासाठी मित्रांना सढळ हस्ते खुप मदत केली होती. हा हिरो जेव्हा स्वबळावर लग्न करायला निघाला तेव्हा १००००/- ची मदत (?) करायला हि याचे मित्र तयार नव्हते. आणि मदत कसली खरेतर याचेच पैसे जे अजुन कोणी दिले नव्हते ते परत करायला तयार नव्हते. शेवटी लग्न पुढे ढकलायची वेळ आली तेव्हा याने घरच्यांना खरी कल्पना देवुन वडिलांकडुन पैसे घेतले.

पण नंतर या मुलाने एक गोष्ट खुपच चांगली केली ती म्हणजे घरचे ठाम पाठीशी उभे राहिल्यानंतर सर्वात पहिले काम काय केले तर याने ज्यांना मदत केली होती व त्यांनी आता याला मदत करायची टाळाटाळ केली त्यांच्या बरोबर सरळ संबंध तोडुन टाकले.

या सर्व प्रसंगावरुन मलाच प्रश्न पडला, खरे मित्र खरेच असतात का?

२ टिप्पण्या:

  1. म्हणजे आपण मित्र उपयोगी पडावेत म्हणून गोळा केसे होते !

    उत्तर द्याहटवा
  2. मित्र उपोयगी पडावेत म्हणुन नाहि गोळा केले जात... तर त्यांच्या आपण उपयोगी पडले पाहिजे म्हणुन गोळा केले जातात.

    btw तुम्हि लेख पुर्ण वाचलात का? मी हा पोस्ट का केला आहे ते समजेल..

    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा