मोनालिसा
लास्ट सपर
द दा विंची कोड
माझ्या आवडत्या लेखकांमधे डॅन ब्राऊन यांचे नाव खुप वर आहे. त्यांनी आज पर्यंत डिजीटल फोर्टेस, एंजल्स अॅंड डेमन्स, डिसेपश्न पॉइंट, द दा विंची कोड, लॉस्ट सिम्बॉल इतकीच मोजकी पुस्तके लिहिल आहेत. त्यांचे नाव गाजले ते द दा विंची कोड या पुस्तकामुळे.
द दा विंची कोड या पुस्तकाच्या आज पर्यंत ८० लाख कॉपीज जगभर विकल्या गेल्या आहेत. मराठी मधे सुद्दा मेहता पब्लिकेशनने हे पुस्तक छापले आहे.
या पुस्तकाची सुरवात होते ती पॅरिस मधील लुव्हर संग्रहालायाच्या व्यवस्थापकाच्या खुनामुळे. व्यवस्थापकाने मरताना स्वताच्या अंगाभोवती आणि अंगावर अशी काही चिन्हे काढली असतात की त्याचे विश्लेषण करण्यासाठी हॉवर्ड मधील प्रसिद्द चिन्हेतज्ञ रॉबर्ट लँगड्न यांना बोलावले जाते आणि मजेची गोष्ट अशी की तपास अधिकारी बेझु पाश याच्या नजरेत स्वतः लँगड्न हाच खुनी असतो.
पॅरिस पोलीस खात्यामधील गुप्तलिपीतज्ञ सोफिया नेव्हुच्या साथीने लँगड्न विविध चिन्हांमधुन खुन्याचा माग काढायला सुरवात करतो तेव्हा त्यांना लिओनार्दो विंचीच्या मोनालिसा, लास्ट सपर या चित्रांमधील तसचं चर्चने लपवुन ठेवलेले होली ग्रेलचे गुपिते उघड होवु लागतात.
खुन झालेला व्यवस्थापक दुसरा तिसरा कोणी नसुन प्रायरी ऑफ सायन्स या गुप्त पंथाचा मास्टर असतो. तो पंथ ज्याचे मेंबर सर आईझ्याक न्युटन, व्हिकटर ह्युगो, विंची सारखे नावाजलेले लोक असतात. काय होता हा पंथ? कशासाठी कार्यरत होता? असे कोणते रहस्य होते ज्यासाठी व्यवस्थापकाला स्वताचा जीव गमवावा लागला? १३ आकडा अशुभ का मानला जातो? फिबोनाची सिरिज काय आहे? हि रहस्य उघडण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे.
Digital fortess - Best
उत्तर द्याहटवा