१. इच्छा आहे तिथे अडथळे असणाराच.
२. कोणतेहि काम करण्याचा आणखी एक सोपा मार्ग असतो.
३. ज्याच्याकडे एकच घड्याळ आहे त्याला वेळ कळते. ज्याच्याकडे दोन घड्याळं असतात, त्याला खात्री नसते.
४. समस्येचं निरकरण होत असताना एक नविन समस्या निर्माण होते.
५. तुम्हि तुमची कार स्वच्छ धुतलीत कि पाऊस येतो.
६. दुपारी डुलकी लागली कि कुरियरवाला येतो.
७. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेच. मग ते उत्तर तुम्हाला आवडो वा न आवडो.
८. सिगरेटमुळे बिनडोक माणसाला तोंडात धरायला काहि तरी मिळतं
९. जो घोरतो तोच आधी झोपलेला असतो.
१०. जो बराच काळ मोठ्याने हसतो त्यालाच विनोद कळलेला नसतो.
११. तुम्हि काम हातावेगळे करुन आरामात रेलुन बसता तेव्हाच केबिनमधुन बॉस बाहेर येतो.
१२. नव्या कोर्या टायला नेहमीच सुपात बुडायला आवडतं
१३. तुम्हि रेडिओ लावा. तुमच्या आवडत्या गाण्याच्या शेवटच्याच ओळी ऐकायला मिळतात.
१४. कर्ज घेण्यापुर्वी नेहमीच आपण किती श्रीमंत आहोत ते दाखवावे लागतं.
१५. कोणत्याहि वादातुन पैसे निर्माण होण्याची शकत्या खुपच जास्त असते.
१६. प्रत्येक यशस्वी पुरषामागे एक बाई असते आणी अयशस्वी पुरषामागे दोन बायका असतात.
१७. सर्वांना मरण येणार हे नक्किच असतं पण मरणाच्या दारात पोहचे पर्यंत एक आयुष्य फुकट जातं.
१८. गणितातील सर्वात मोठी गमंत म्हणजे - १००० वर्ष संपली, करोडो सुत्र तयार झाली आहेत पण अजुन हि 'X' ची किंमत कळली नाहि आहे.
१९. आज हि देवळाच्या बाहेर तुफान गर्दि असते कारण गुगलवर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळत नाहि.
२०. यशाचे गमक काय तर अचुक निर्णय, अचुक निर्णय अनुभवातुन येतो आणि अनुभव चुकिच्या निर्णयातुन...
7 , 14, 18, 19 aani 20 bhannat....!!!!! :D
उत्तर द्याहटवा