मानवाने आकाशात झेप घेतली, चंद्रावर पाऊल ठेवले, गुरुवर, सुर्यावर अवकाश यान धाडले या सर्व ग्रह, तार्यांबद्दल माहीती मिळावली.
पण
जेव्हा त्याने स्वताच्या भुत़काळात डोकावुन पाहीले तेव्हा त्याच्या चेहरा तोंडात मारल्या सारखा झाला. कारण एकच सुर्य, चंद्रच्या नादात स्वताच्या ग्रहाकडे लक्ष दिलेच नाही. आधुनीक काळातील मानवाला एकच घमेंड आहे ती म्हणजे तो त्याच्या पुर्वांजा पेक्षा अधिक प्रगत आहे. पण मेक्सिको मधील पालेन्क मधील माया लोकांच्या पिरॅमीड मधील अग्नीबाण्, जगातील प्राचीन चित्रांमधील अंतराळवीर, पेरु देशातील एका दगडावर ह्र्दय बदलण्याचे चित्र, सुमेरियन लोकांची १५ आकडी संख्या जी आजच्या कंम्पुटरवर ही दिसत नाही. अश्या बर्याच घटना बघुन तो जागीच थिजुन गेला.
खरोखर जे आपल्या पुर्वजांनी लिहुन ठेवले आहे, चित्रकाम करुन ठेवले आहे त्या बद्दल आपल्याला जास्त काहीच माहीती मिळत नाही, नाही कोणी त्याबद्दल बोलत. आंतरजालावर शोधत असताना अश्याच काही गोष्टी मला सापडल्या त्याच गोष्टींबद्दल आज मला ब्लॉगायचे आहे.
१. पिरीरीसचा नकाशा.
१५१३ मधे तुर्कस्तान मधे 'पिरीरीस' नावाचा एक अॅडमिरील होता. त्याने जगाचा एक नकाशा बनवला. तो नकाशा दोन भागात हरणाच्या कातड्यांवर वेगवेगळ्या रंगानी बनवला आहे. हा नकाशा १९२९ मधे सापडला. पण खुप लोकांना तो नकाशा चुकिचा वाटत होता. तेव्हा श्री. मॅलरी (अमेरीकन तज्ञ) यांनी अमेरीकन आरमाराच्या वॉल्टर्स यांची मदत घेवुन उपग्रहांद्वारे कॅरोच्या खुप उंची वरुन फोटो घेवुन पाहीले तर त्यांना धक्काच बसला. कारण त्या नकाशा मधे दाखवण्यात आलेली खंडाची टोके थोडी खेचल्यासारखी, निमुळती होती आणि कॅरो वरुन घेतलेल्या फोटोशी हा नकाशा तंतोतंत जुळत होता. १५१३ मधे जेव्हा कोलंबसला नुकताच अमेरीकेचा शोध लागला होता त्या काळाच्या नकाशा मधे अमेरीका दाखावली होती. विमानाच्या सहाय्याने बनवला नकाशा १५१३ मधे बनवलेल्या नकाशाशी कसा काय तंतोतंत जुळला? पिरीरीसने हा नकाशा कोणत्या उपकरणांच्या सहाय्याने काढला? आज ही या आणि इतर प्रश्नांची उत्तर कोणी देवु शकले नाही आहेत.२. नाझका लाईन्स
दक्षिण अमेरीकेतील पेरु देशात अँडीज पर्वतांमधे एका कड्यावर त्रिशुळ खोदला आहे. या त्रिशुळाच्या दिशेने गेलो तर पर्वतावर नाझकाचे पठार आहे. त्या पठारावर मैलोपर्यंत सरळ रेषा आहेत. काही समांतर तर काही एकमेकींना छेद देत आहेत. या रेषांनाच इंकाचे रस्ते ही म्हणतात. कारण इथे पुर्वी इंका जमातीमधील लोक रहात होते. हे रस्ते इतके लांब लचक आहेत कि आकाशातुन पाहीले तर असे वाटते की जणु फार मोठा विमानतळच आहे.
३. बोलिव्हिया मधील सुर्यमंदिर
दक्षिण अमेरीके मधील बोलिव्हिया देशातील टियाहुन्को शहरामधे भग्नावस्थेमधे एक सुर्यमंदिर आहे. त्या मंदिराचे द्वारच ९.८ फुट उंच आणि १३ फुट लांब आहे. आश्वर्याची गोष्ट अशी की हे द्वार १० टनाच्या एकाच दगडामधे कोरले आहे. प्राचीन काळामधे हे कसे शक्य आहे? याच शहरात एक २० टन वजनाची आणि २४ फुट उंच मुर्ती सापडली आहे. या मुर्तीवर असंख्य चिन्हे आणी चित्रे आहेत ज्यांचा आज पर्यंत अर्थ लागला नाही आहे.
४. इस्टर आयलंडयाच शहरामधील पठारावर गेलो तर आपण पाहु शकतो की १०० टन वजनाच्य दगडावर ६० टन वजनाचे दगड रचुन भिंती बनवल्या आहेत. या भिंतींमधेच अनेक दगडी चेहरे कोरुन काढले आहेत. या शहरामधे त्या पुतळ्यांना 'मोई' म्हणतात. हे पुतळे इथे कसे आले? कोणी इतके अजस्त्र पुतळे बनवले याचे उत्तर अजुन सापडायचे आहे.
५. पिरॅमिड
इजिप्त मधील पिरॅमिड सर्वांनाच माहीत आहेत. पण इतके अजस्त्र दगड तिथे कसे आले याचा विचार कोणी केला आहे का? आज संपुर्ण वाळवंट असलेल्या इजिप्त मधे इतके मोठे दगड कसे एका ठिकाणाहुन दुसरी कडे नेले असतील? वाळवंट आजच्या काळातील आहे की प्राचीन काळापासुन आहे? या अजस्त्र दगडामधे रस्ते, भुयार कोणी खोदुन काढले? सुपरिचीत खुफुच्या पिरॅमिडला १००० दशलक्षांनी गुणले तर पृथ्वी आणि सुर्याचे अंतर समजुन येतं. पिरॅमिड बांधण्यासाठी हजारो लोक लागले असतील तर त्यांच्या निवासाची, जेवणाची सोय कशी केली गेली?
६. माया संस्कृती
अतिशय प्रगत मानली गेलेल्या संस्कृती पैकी एक असलेल्या माया संस्कृती बद्दल फारसे काहीच समजु शकले नाही आहे. कारण स्पैनीश लोकांच्या आक्रमणामधे त्यांचे बरेच ग्रंथ नष्ट केले गेले. जे थोडे फार हाताशी आहे त्यात एक त्यांचे कॅलेन्डर, काही चित्रे. या सर्वात इतक्या चिन्हांची आणि खुणांची रेलचेल आहे की प्रत्येक जण स्वताच्य समजुती प्रमाणे अर्थ काढत आहे. मायालोक २० पर्यंत अंकगणिताचा वापर करत होते.
मोहेंजोदाडो आणी हरप्पा संस्कृती बद्दल पण तेच कोणी ही या लोकांच्या चिन्हांचा अर्थ लावु शकले नाहीत. उलट तिथे सापडलेल्या मृत शरीरामधे किरणॉस्तर्ग आढळुन आला आहे. हिरोशिमा आणि नागासाकी वर टाकल्यानंतर जितका किरणोस्तर्ग बाहेर पडला त्याहुन जास्त मोहेंजोदडो मधील मृत शरीरांमधे आढळला आहे. अतिप्राचीन काळात इतका किरणोस्तर्ग आला कोठुन?
७. प्राचीन भारत
पहिल्या अणुबॉम्बचे जनक जे. रोब्रट कोपनहेमर यांना विचारण्यात आले होते की, "जगातील पहिल्या अणुबॉम्बची निर्मीती करुन कसे वाटत आहे?" त्याचे त्यांनी ऊत्तर असे दिले की," जगातील पहिल्या नव्हे तर आधुनीक जगातील पहिल्या अणुबॉम्बची निर्मिती कारण जगातील पहिला अणुबॉम्ब प्राचीन भारता मधे वापरले गेले होते." इतक्या मोठा तज्ञ असे बोलत असेल तर त्या वर नक्कीच विश्वास ठेवायला पाहीजे. हे जर खरे असेल तर आपल्या पुर्वजांना हे ज्ञान कसे मिळाले? महाभारत युद्धा मधे वर्णली गेलेली शस्त्र ही अण्वस्त्रच होती हे आता जवळपास सर्वानाच मान्य आहे. इतके मोठे ज्ञान कोठुन मिळाले?
हाच खरा जागतिक वारसा आहे. जो आपण जपला पाहिजे.
ख्रिश्र्चन धर्म सर्वश्रेष्ठ ही मोजपट्टी घेऊन इतिहासाचा लावलेला अर्थ नाकारल्यासच या प्रश्रांची उत्तरे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
उत्तर द्याहटवा