मंगळवार, १६ ऑगस्ट, २०११
या देशात अराजक निर्माण करायचे आहे का?
इजिप्त, ट्युनिशिया, येमेन सारखे या देशात जर अराजक निर्माण झाले तर त्याची जबाबदारी घेण्याची अण्णांची तयारी आहे का? बरेच लोक या आंदोलनाला कोंग्रेसविरोधी समजुन पाठिंबा देत आहेत पण हिच वेळ जेव्हा त्यांच्या पक्षावर येईल तेव्हा काय करतील? महाराष्ट्राचा इतिहास त्यासाठी सा़क्षी आहे. आज अण्णांना डोक्यावर घेणारे काल अण्णांना वाकड्या तोंडाचा गांधी म्हणत होते. लोकपाल विधेयक आणले म्हणजे भ्रष्टाचार संपणार आहे का? पण अण्णांच्या हेकट वागण्यामुळे या देशात पुन्हा आणीबाणी मात्र लागु शकते. ४ दिवसांची नाटके आहेत. उद्या सकाळपर्यंत यातले किती लोक रस्त्यावर राहितील ते अण्णांनापण माहित असेल.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
काय म्हणता कॉंग्रेसी? तुम्हाला भ्रष्टाचार आवडतो वाटतं? गेट वेल सून.
उत्तर द्याहटवा@ साधक - एक लोकपाल आणले तर देशातला सर्व भ्रष्टाचार संपणार आहे का? आणि मी जे म्हटले आहे ते किती खरे आहे ते तुमच्या प्रतिसादातुन दिसले आहे. २२०० वर्षापुर्वी आर्य चाणक्यने लिहुन ठेवले आहे "जसे पाण्यातील मासे कधी पाणी पितात ते कळत नाहि तसेच सरकारी अधिकारी कधी पैसे खातात ते कळणार नाहि"
उत्तर द्याहटवाआणि शेवटी कसे आहे दगड त्यानेच मारायचा असतो ज्याने पाप केले नाहि. तुम्हि आज पर्यंत कधी हि कोणाला चिरी मिरी दिली नाहि आहे का? अण्णा हजारेंना न्या. पी. बी. सावंतांनी का ७ दिवसांची शि़क्षा केली होती? राहिला प्रश्न मी कोंग्रेसवाला आहे की इतर ते तुम्हाला सांगत बसायची गरज नाहि कारण तुम्हि मला ओळखत नाहि आणी एका पोस्ट वरुन लेबल लावणार्या माणसाला तर बिलकुलच नाहि.
असो पुढच्या वेळेला इतर कोणत्याहि ठिकाणी पोस्ट करण्यापुर्वि थोडि तरी परिपक्वता दाखवा हि आशा.
नोकरशाहीला वा सरकारला बदनाम करण्यासाठी लोकपाल विधेयकाचा वापर होऊ नये याची तरतूद करण्याला अण्णांचा विरोध आहे असे दिसते. भ्रष्टाचार थांबविण्याबद्दल त्याना आच असती तर त्यानी सरकारी विधेयकात बदल सुचविले असते.
उत्तर द्याहटवा