गुरुवार, १८ ऑगस्ट, २०११

वाह रे अण्णा.....

आधी आमरण उपोषणाची घोषणा करायची, दुसर्‍या स्वातंत्र्याची लढाई म्हणायची, आणि आता फक्त १४ दिवस उपोषण करायचे......देशातल्या जनतेला पुन्हा पुन्हा चुतिया बनवल्याबद्दल अण्णांचे हार्दिक अभिनंदन.............दुनिया झुकती है सिर्फ झुकानेवाला चाहिये..............
देशातल्या भ्रष्टाचार मिटवण्याचा निर्धार करणार्‍या माणसाला दिल्लीतच उपोषण का करायचे आहे? अख्खा हिंदुस्तान आहे कि. पण अण्णांना दिल्लीतच बसायचे आहे कारण दिल्लीमधे जो प्रसिद्धिचा झोत मिळेल तो इतर ठिकाणी नाहि मिळणार. १४ दिवसच उपोषण करायचे होते तर आधी आमरण उपोषणची भाषा का करायची? किंवा १४ दिवसानंतर जर दिल्ली बाहेर आमरण उपोषण करायचे आहे तर आज पासुनच दिल्ली बाहेर का नाहि करत?

भ्रष्टाचार कोणालाच नको आहे पण त्यासाठी आपले तेच खरे कसे काय? लोकशाहिची भाषा करायची आणी हुकुमशहासारखे वागायचे ही कोणती पद्दत.

सर्वात महत्वाचे म्हणजे अण्णा आणी त्यांचे सहकारी पंतप्रधानांना लोकपालमधे आणायला उत्सुक आहेत पण स्वयंसेवी संस्थांना लोकपाल मधुन बाहेर ठेवायचा आग्रह करत आहेत हे कशासाठी? कारण या संस्था चालवणारेच जनलोकपालाचा आग्रह धरत आहेत.

एकिकडे संसद सर्वोच्च मानायची पण स्वत:ला हवा तो कायदा पास करण्यासाठी ब्लॅकमेलींगचे धोरण अवलंबवायचे. दुसर्‍या स्वातंत्रलढ्याची भाषा करायची पण याच देशात जयप्रकाश नारायण यांनी दुसरा स्वातंत्रलढा दिला होता ते विसरुन जायाचे. मुळात जनलोकपाल विधेयक हे केजरीवाल, स्वामी अग्निवेश आणी इतर यांचे अपत्य आहे. पण या लोकांना मास बेस नसल्याने हे लोक अण्णांच्या खांद्यावरुन गोळी झाडत आहेत. इतकेच आहेत तर किरण बेदी, केजरीवाल, भुषण पिता पुत्र, स्वामी अग्निवेश का नाहि उपोषणाला बसत.

अण्णा म्हणतात, लोकपाल आले तर मनमोहन सरकार मधले सगळे मंत्री तुरुंगात जातील. पण याच अण्णांना काळ्या पैश्याने पिक्चर काढणार्‍या बॉलीवुडचा पाठिंबा चालतो. आजच्या पेपर मधे टॅक्सी चालवणारे अण्णांना पाठिंबा देत आहेत याचा फोटो पाहिला. आता मुंबईमधले टॅक्सीवाले काय आहेत ते वेगळे सांगायची गरज नाहि आहे. दुसर्‍यांना भ्रष्ट म्हणणार्‍या अण्णंना नियम न पाळणारी, स्वतः भ्रष्ट असणारी लोक आंदोलनात चालतात. न्या. पी. बी. सांवतांनी अण्णांना त्यांच्या ट्रस्टच्या घोटाळ्याबद्दल ७ दिवसांची शि़क्षा ठोठावली होती त्याबद्दल अण्णा काहि बोलत नाहित. महाराष्ट्रामधे अण्णा कसे आंदोलन करायचे ते सर्वांनी पाहिले आहे. आधी घोषणा करायची मग कोणी मंत्री भेटला कि गप्प बसायचे. इथेच केंद्र सरकारचे चुकले. त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या एकण्यापेक्षा कपिल सिब्बल, अंबिका सोनी या दरबारी राजकरण्यांचे एकले.

विरोधी पक्ष टिव्हिवर अण्णांच्या लोकपाल विधेयकाला पाठिंबा देतो आणि संसदेमधे सरकारने मांडलेल्या विधेयकालाहि पाठिंबा देतो. अण्णांचे विधेयक कोणत्याहि परिस्थीतीमधे पास होणार नाहि आहे हे अण्णा आणी त्यांचा गोतावळा चांगल्या प्रकारे जाणुन आहेत. पण जमेल तितका हैदोस घालुन पुढच्या वेळेसाठी आपली किंमत ठरवुन घेयाची आहे. एक लोकपाल विधेयक आणले म्हणजे देशातला सर्व भ्रष्टाचार मिटणार आहे का? आर्य चाणक्यने २२०० वर्षापुर्वि लिहुन ठेवले आहे कि, "जसे पाण्यातील मासे पाणी कधी पितात ते कळत नाहि तसेच सरकारी अधिकारी कधी पैसे खातात ते कळणार नाहि" उद्या प्रत्येक समुह जर स्वताच्या मागण्यासाठी (ज्या त्यांच्यासाठी योग्य असतील) देशाला वेठिस धरु लागला तर काय करायचे?

आज अण्णांना पाठिंबा देणारे किती तरुण आजपासुन बाईक / गाड्या नियम पाळुन चालवणार आहेत किंवा वाहतुक हवालदाराने प़कडले तर चिरिमिरी न देता पावती घेणार आहेत. किती लोक स्वताच्या मुलाला डोनेशन न देता प्रवेश घेणार आहेत. अण्णांना विरोध म्हणजे कोंग्रेसचा ह्स्तक आणि त्याला भ्रष्टाचार विरोधी म्हणायची फॅशन झाली आहे. बर्‍याच लोकांना तर जनलोकपाल विधेयक काय आहे तेच माहित नाहि पण अण्णा मनमोहन सिंग सरकारला पर्यायाने कोंग्रेसला विरोध करतायत ते समजुन अण्णांच्या आंदोलनात उडी घेवुन बसले आहेत पण हेच अण्णा जेव्हा त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या आवडत्या पक्षाच्या बोलतील तेव्हा हे लोक काय करणार. त्याचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रामधे युती शासनाच्या काळात अण्णांना वा़क़ड्या तोंडाचा गांधी बोलणारी शिवसेना आज त्यांना पाठिंबा देत आहे. अण्णांना पाठिंबा देणार्‍या भाजपाचा अण्णांच्या टीममधील न्या. संतोष हेगडेंना पण पाठिंबा आहे का? आज मिडीया अण्णांना डोक्यावर घेवुन नाचत आहे. पण मिडिया किंवा अण्णांबरोबर नाचणार्‍या लोकांना महिन्याभरापुर्वी मुंबईमधे बाँम्बस्फोट झाले होते ते आठवतात का? त्याच्या तपासामधे किती प्रगती झाली आहे त्या बद्दल कोणीहि काहि माहिती देत नाहि आहे. ती जबाबदारी कोणाची? किंवा आज सचिन तेंडूलकरने १०० वे शतक केले तर मिडिया कोणाला चमकवेल. आज जे लोक पाठिंबा देत आहेत त्यातले किती जण येत्या शनिवार, रविवार, सोमवारची सुट्टी सोडुन अण्णा अण्णा करत बसणार आहेत.

लोकपाल पास होईल कि नाहि ते माहित नाहि पण अण्णा देशाला अराजकतेकडे नक्की घेवुन जात आहेत. मिडियाला हाताशी धरुन जो नाच घातला जात आहे त्याचे परिणाम दुसर्‍या स्वातंत्र्यात नाहि पण दुसर्‍या आणीबाणीत झाले तर त्याचे जबाबदारी अण्णा घेणार आहेत का?


६ टिप्पण्या:

 1. असे अन्ना हजारे यांच्याबद्दल लिहिणारी व्यक्ती म्हणजे मुर्ख आहे असे मी म्हणतो. अन्ना हजारे जर चुतिया बनवतात तर मग हे कॉंग्रेस चे राजकारणी काय करतात? इतके घोटाले करुन ठेवले आहेत त्याबद्दल काही माहित आहे का? मी स्वतः तुमच्या ब्लोगचा नियमित वाचक आहे. पण असे लिहिणे तुम्हाला शोभत नाही. एखादा माणुस जर वर जात असेल तर त्याचे पाय खेचायाचे इतकेच तुम्हाला माहित आहे. आज सारा देश अन्ना हजारे यांच्या पाठीशी उभा आहे , आणि तुम्ही स्वतः एक मराठी माणूस असून त्यांच्या विषयी से बोलता. अत्यंत लाजिरवानी गोष्ट आहे ही. तेव्हा जनक्षोभ होण्याच्या अगोदर ही पोस्ट काडून टाका.

  उत्तर द्याहटवा
 2. अण्णा हजारे आग्रह धरताहेत त्या प्रकारचा लोकपाल भ्रष्ट राजकारणी सोडून समाजातील इतर सर्वांना मान्य आहे असेही मुळीच नाही पण ज्या प्रकारचा मिळमिळीत वा बुळबुळीत लोकपाल सरकार आणू पाहत आहे तो आणुन, न आणून, सारखाच
  pan tumchya lekhache samrthan honar nahi

  उत्तर द्याहटवा
 3. तुमचा लेख बकवास आहे...पाय खेचणे हेच तुमचे काम दिसते आहे..
  ..तुम्हाला सामान्य माणूस दिसत आहे..अण्णा हजारे भ्रष्ट दिसतो आहे..पण हे राजकारणी लोक नाही दिसत....!!!

  उत्तर द्याहटवा
 4. अण्णा हजारे यानी आतापर्यंत बरीच आमरण उपोषणे केली आहेत.

  उत्तर द्याहटवा