शुक्रवार, २३ मार्च, २०१२

भारताची मोठी घोडचुक.



संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेच्या श्रीलंकेविरोधातील ठरावाला पाठिंबा देवुन भारताने स्वतच्या हाताने कुह्राड पायावर न मारता पाय कुह्राडी वर टाकला आहे. जिथे चीन, रशिया, बांग्लादेश, म्यानमार सारखे आशियायी देश श्रीलंकेविरोधातील ठरावाला विरोध करत होते तिथे मनमोहन सिंग सरकार स्वताची खुर्ची वाचवण्यासाठी त्या ठरावाला पाठिंबा देवुन बसले. सरकारला देशापेक्षा स्वताची खुर्ची महत्वाची वाटली.

या घोडचुकीचा चीनने फायदा नाहि उठवला तर ते जगातले आठवे आश्चर्य ठरेल. आधीच चीन भारतीच हिंदी महासागरामधे कोंडि करत आहे. त्यात आता श्रीलंकेची भर पडली आहे.

या सरकारला ना कोणतेहि आर्थिक धोरण आहे ना परराष्ट्र धोरण ना सुरक्षा धोरण. फक्त एकच धोरण आहे ते म्हणजे पैसे कसे खाता येतील. कालच १०.६ लाख करोडचा कोळसा घोटाळा उघड झाला आहे.

एककाळ होता की भारताने काश्मीरच्या मुद्द्यवरुन पाकिस्तानला जागतिकस्तरावर एकटे पाडण्याचा प्रयत्न केला होता पण आता परिस्थीती अशी आहे की भारत स्वतच्या चुकांमुळे एकटा पडत चालला आहे.

आता तामीळींच्या राजकारणामुळे हे सर्व करत आहेत. जेव्हा प्रभाकरन श्रीलंकेत नरसंहार करत होता तेव्हा हेच तामीळ राजकारणी त्याला हिरो समजत होते. मागे त्या ममताच्या आडमुठेपणामुळे बांग्लादेश बरोबर पाणी करारावर सहि नाहि होवु शकली. या पुढे काय काय होणार आहे ते देवालाच ठावुक.
 

शेवटी UPAचा अर्थच काय आहे.UPA = Under Pressure from Alliance

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा